Breaking News

चांदेकसारे पाणी टाकीला फेर मंजुरी


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील चांदेकसारे येथील २५ हजार लिटर पाणी टाकी मंजुर असुनही काम वेळेत सुरु झाले नाही. त्यामुळे सर्व निधी पडून होता. पंचायत समितीच्या सभापती अनुसया व जि. प सदस्य सोनाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, या टाकीसाठी एका वर्षांचा वाढीव वेळ देण्यात आला. यामुळे भैरवनाथ जोगेश्वरी भक्त व ग्रामस्थाना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती सभापती अनुसया होन यांनी दिली.