Breaking News

निमगाव वाघा येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानाला प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नवनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 


प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, शुभांगी धामणे, मंदा साळवे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव तथा राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे आदिंसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त लेक वाचवा, लेक शिकवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दि.26 जानेवारी पर्यंन्त मुलींच्या सक्षमीकरणासाठी गावात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या महिलांचा गौरव, माजी शालेय विद्यार्थीनींचा सत्कार, स्त्री जन्माचे स्वागत आदि विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली.