Breaking News

राज्यस्तरीय कथा, कविता लेखन स्पर्धेचे आयोजन


शेवगाव / प्रतिनीधी - शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळ आणि अ. भा. बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे 27 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये होणार्‍या अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमिताने राज्यस्तरीय कथा व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष हरीश भारदे आणि स्पर्धा प्रमुख निलेश मोरे, प्रदीप बोरुडे, बाळासाहेब घावटे यांनी दिली. या स्पर्धेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयावरील स्वरचित कथा कविता पाठवता येणार आहे, कथा - कविता दीर्घ नसावी पहिल्या पाच कथा व कवितांना संमेलनामध्ये पुरस्कृत केले जाणार असून या विजेत्यांना संमेलनात मान्यवरांच्या सोबत मंचावर आपल्या रचना सादर करण्याची संधी मिळणार आहे. विजेत्या स्पर्धकांनी संमेलन स्थळी स्वखर्चाने पालकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. स्पर्धकांनी आपल्या कथा - कविता दि. 12 जानेवारी पर्यंत प्राचार्य, बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.