इंदौर : भरधाव ट्रकची व एका खाजगी शाळेच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने ६ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात घडली. 'दिल्ली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना कनाडिया भागातील बायपास रोडवर ही घटना घडली. मात्र, या दुर्घटनेत किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नसल्याचे अतिरिक्तपोलीस अधीक्षक मनोजकुमार राय यांनी सांगितले.
ट्रक-स्कूल बस अपघातात ६ ठार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:44
Rating: 5