Breaking News

नवीन वर्षातही ‘मरे’चे रडगाणे सुरुच


ठाणे, - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. ठाकुर्ली स्थानकात एलसी गेट उघडे राहिल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशाचा हिरमोड होऊन नाराजीचे सूर उमटत आहेत.