टेंभूर्णी हत्याकांड निषेधार्थ मुकमोर्चा आज खर्डा बंदचे आवाहन
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील वडार समाजाच्या शालेय विद्यार्थीनी कोमल पवार हिचे अपहरण करून अत्याचार करून निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील वडार समाज व बहुजनांच्या वतीने मुकमोर्चा काढून जामखेड तहसिल व पोलीसांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.
नुकतेच कोपर्डी येथील शालेय विद्यार्थीनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने, महाराष्ट्रातील महिला व मुलींवरील अन्याय अत्याचार, खून हे प्रकार थांबून, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नांदेल असे वाटत होते मात्र या घटनेचे पडसाद थांबत नाही, तोच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी गावातील वडार समाजाच्या बारावीत शिकत असणारी शालेय विद्यार्थीनी कोमल आंनद पवार हिस काही अज्ञात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधामांनी तिचे अपहरण करून पाशवी अत्याचार करून तिचा निर्घृण खून करून मृतदेह तलावात टाकून आरोपींनी पोबारा केला.
तसेच या घटनेला दहा बारा दिवस उलटले, तरीही पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हेगारांचा शोध घेतला नाही, किंवा गुन्हेगाराला अटक करू शकले नाहीत, तसेच राजकीय लोकप्रतिनिधी आरोपीच्या पाठीशी उभे राहून अल्पसंख्यांक मुलीवर झालेला अत्याचार दडपन्याच्या प्रयत्नात असल्याचे समाजबांधवांमधून बोलले जात आहे.
मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नसून आजही गुन्हेगार मोकाट फिरत असून कायदा व सुव्यवस्था अल्पसंख्यांकांसाठी नाही का असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे, मुलीचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असून, भितीच्या सावटाखाली प्रत्येक दिवस काढत आहेत. त्यांना कुठल्याच प्रकारचे संरक्षण नसून झालेला प्रकार दडपण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींच्या वतीने सहकार्य मिळत नसून उलट घडलेला हा प्रकार दडपण्यासाठी कोमल पवार हिच्या कुटुंबावर सत्तेचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, या सर्व घटनेचा जामखेड तालुक्यातील वडार समाज संघटना लोकधिकार आंदोलन, बहुजन संघटना व सकल मराठा संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष इत्यादी सामाजिक संघटनांच्या पाठीब्यांने वडार समाजाच्या वतीने जामखेड तहसिल आणि पोलीस स्टेशन यांना निषेधाचे निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी वडार समाज जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप गायकवाड, लोकाधिकार आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष अरूण जाधव, मोहन पवार, नगरसेवीका लता गायकवाड, राजश्री पवार, वडार समाज अध्यक्ष बिभीषण चौघुले, भागवत सुरवसे, नगरसेवक अमित जाधव, राजेंद्र डोकडे, बापु ओहोळ, बापुसाहेब गायकवाड, विकास पांढरे, विलास विटकर, संजय विटकर, राजू शेलार, नवनाथ सुरवसे, महादेव पवार, आण्णा विटकर, आदींसह सर्व बहुजन रा. स. प, सकल मराठा संघटना यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. या सभेमध्ये सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी न्यायासाठी संतप्त भावना व्यक्त करुन शासनाने या घटनेची त्वरीत दखल घेऊन आरोपीस अटक करावी, तसेच कुटुंबावर दडपशाही करणार्या राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी केली. तसेच या घटनेच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील खर्डा येथे वडार समाज व बहुजन समाजाच्या वतीने दि. 5 रोजी खर्डा शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असून, बंद संदर्भातील निवेदन तहसिल व पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळी बहुजन कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.