Breaking News

गणेश जयंती उत्सवाला भाविकांची गर्दी


अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक (ता. कर्जत) येथे माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चार दिवस चाललेल्या या जयंती महोत्सवाची ह.भ.प श्रीकृष्ण धुंडीराज पुरोहित महाराज यांचे किर्तन व पाळणा पदे गाऊन सांगता झाली. या महोत्सवासाठी मंदीराच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातील सिध्दिविनायकाच्या मूर्तीस मौल्यवान अलंकार व फुलांनी सजविण्यात आले होते.
गणेश जयंती उत्सवासाठी पंचक्रोशीतील महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे वाहन पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. विकास आराखडयांची कामे रखडल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा गणेशभक्त व्यक्त करत आहेत. यामध्ये भरिस भर म्हणून मोबाईल कंपनीने रस्त्याच्या कडेला केलेल्या खोदकामामुळे भाविकांची कोंडी होत होती. दर्शनाला येणार्‍या भाविकांमुळे दौंड, कर्जत, श्रीगोंदा, राशीन राज्य मार्ग गर्दिने फुलून गेले होते.