Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पाआधीच मुंबईकरांवर महागाईची कुर्‍हाड


मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, त्याआधीच मुंबईकरांवर महागाईची कुर्‍हाड कोसळली असून, मुंबईत पेट्रोलचे दर 81 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. तर मुंबई महापालिकेच्या रुग्णसेवेच्या दरात सुमारे 30 टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बेस्टचा प्रवासही येत्या काही दिवसात महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी नव्या वर्षाची सुरूवात महागडी ठरतेय.