Breaking News

ज्ञानेश्वर पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्पोर्टस सप्ताहाचे दिमाखात उदघाटन


नेवासा/तालुका प्रतिनिधी/-तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कुल व ज्ञानेश्वर पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्पोर्टस सप्ताहाचे उदघाटन नेवाशाचे तहसिलदार उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक प्रविण लोंखडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश पा.बेल्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पोर्टस सप्ताहाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.फु.कृषिविद्यापिठाचे डॉ.महावीरसिंग चौहान (कृषी रसायन शास्त्रविभाग) हे होते. प्राचार्य शशीकांत देवरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन स्पोर्टस सप्ताह संबंधित सविस्तर माहिती दिली. मान्यंवराचे डॉ.सुरेश पा.बेल्हेकर यांनी स्वागत व सत्कार केला. 

नेवाशाचे तहसिलदार उमेश पाटील बोलतांना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध प्रकारच्या खेळात सहभाग घेऊन आपली शारिरिक व मानसिक जडण-घडण करुन घेण्याचे हेच वय असुन अरोग्य हिच संपत्ती समजावी. तर एखाद्या तरी आवडत्या खेळात विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले पाहिजे. मात्र त्या साठी क्रिडांगण असणे व सराव करणे गरजेचे असते.ते भाग्य तुम्हाला बेल्हेकर संस्थेने येथे प्रशास्त क्रिडांगण व प्रशिक्षण देणारे क्रिडाशिक्षक उपलब्ध करुन दिलेले आहेत.या शिक्षण संस्थेतुन उद्याचे डॉक्टर,इंजिनियर,प्राध्यापक,उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा केली.

नेवाश्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोंखडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी देशी-विदेशी खेळात सहभाग घेऊन आपले व देशाचा नावलोंकिक वाढविण्यात लक्षद्यावे पुर्वी मुलं घराच्या बाहेर जाऊन शारीरिक श्रमाचे विविध खेळ खेळायचे. व्यायाम करायचे मलखांब व कुस्ती विशेष आवडते खेळ होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश पा.बेल्हेकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, विद्यार्थ्यांनी या प्रशस्त पटांगणाचा विविध खेळ खेळण्यासाठी मुक्त पणे उपयोग करुन घ्यावा.संजुबाबा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्याना खेळाडु वृत्ती व खेळाचे बाळ कडु पाजले.अध्यक्षिय समारोपात प्रा.डॉ.महाविरसिंग चौहान यांनी खेळाचे महत्व पटवुन दिले विद्यर्थ्यांना तर कवीता व किस्से सांगुन हस्य कल्लोळ निर्माण केला नवी चेतना निर्माण केली.

तसेच या कार्यमाला संस्था संचालिका डॉ.रंजना बेल्हेकर, डॉ.अशोक ढगे,डॉ.निवृत्ती तांबे,प्राचार्य योगेश चौधरी,डॉ.अतुल दरंदले,शिवनारायन वाघे,अभिषेक बेल्हेकर,डी.आय.एस,डी.पी.एस चे प्राध्यपक वृंद,शिक्षक आदि उपस्थित होते.