70 हजारांच्या आयफोन आमिषाला भुलले अन 24 हजार रुपयांना फसले
सोलापूर, - आयफोन सात हा सत्तर हजार रुपये किमतीचा मोबाइल कमी दरात मिळणार आहे. तो आपणास मोफत मिळणार असून देशातून आपली निवड झाली आहे. त्यासाठी चोवीस तासात एक गिफ्ट घ्यावे लागेल, असे सांगत चोवीस हजार रुपये बँकेच्या क्रेडिट कार्डावरून परस्पर काढून घेण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. व्यंकटेश दत्तात्रय बुरा (रा. न्यू पाच्छापेठ सोलापूर) यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली आहे.
पूर्वी मिश्रा, प्रिया जैस्वाल (मोबाइल नंबर - 8697437336) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोघींनी मिळून व्यंकटेश यांच्या मोबाइलवर फोन केला. मी अमूक कस्टमर केअरमधून बोलतेय. आपणास आयफोन प्लस हा सत्तर हजाराचा मोबाइल मिळणार आहे. त्यासाठी एक वस्तू खरेदी करा. त्यावेळी कॅमेरा घेण्याची त्यांनी तयारी दाखविली. कॅमेरा पाठवण्याचा, टॅक्स मूळ किंमत म्हणून चोवीस हजार रुपये देण्यास सांगितले. व्यंकटेश यांच्याकडूनच क्रेडीट नंबर ओटीपी नंबर मिळवून घेेऊन 24 हजार रुपये काढून घेतले. क ालांतराने फोनवरून प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार देण्यात आली आहे.