Breaking News

मुख्यमंत्र्याचा हेलिकॉप्टर अपघात


मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेला हेलिकॉप्टर त्रासाचा ससेमीरा कायम आहे. आज मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग सुरु होतं. मात्र हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आलं, त्यामुळे संभाव्य अपघात टळला. आज भाईंदर येथे एस.के स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर इथल्या वर्सोवा पुलाच भूमीपूजन, तसेच इतर विकास कामांचंही भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 
झाले.