Breaking News

मुंबई,पुण्यातील घरांच्या किंमती उतरल्या


मुंबई: मायानगरी मुंबई आणि पुण्यात सातत्याने वाढणार्‍या घरांच्या किमती, यंदा मात्र वेगाने उतरत आहेत.
मुंबईत घरांच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची कपात झाली आहे. गेल्या दहा वर्षात मुंबईतील घरांच्या किमती पहिल्यांदाच इतक्या खाली घसरल्या असल्याचे चित्र असल्याचेनाईट फ्रँक इंडिया या संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट अर्थात रेरामुळे घरांच्या किमती उतरल्याचं सांगण्यात येत आहे.