Breaking News

चायना मांजा विक्रीस बंदी घाला.


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा आनंद लहान थोर घेतात. यावेळी हवेत उडणारे एकमेकांचे पतंग कापण्याच्या स्पर्धा होतात. या स्पर्धा होत असतांना नायलॉन (चायना) मांजा वापरला जातो. या मांजामुळे गंभीर दुखापत होते. त्यामुळे दुखापतीच्या घटना टाळण्यासाठी नायलॉन (चायना) मांजा विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी कोपरगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. 

यासंदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, की नायलॉन (चायना) मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापती होत आहेत. निष्पाप पक्षांनादेखील याचा त्रास होतो. यात अनेक पक्षी यापूर्वी दगावले आहेत. त्यामुळे नायलॉन (चायना) मांजा विक्रीस बंदी घालावी. याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरगाव शहराध्यक्ष सागर लकारे, शुभम इंदरखे, सागर सोनवणे, किरण गुंजाळ, रवी आहेर, गौतम खंडीझोड, आदित्य गरुड, निलेश भंडारी, शुभम ललकारे, महेश दवंगे, पांडुरंग गुरसळ, सिद्धार्थ लकारे, भारत गायकवाड, शुभम लासुरे, रोहित केकाण, प्रसाद नेवगे, तुषार कहार, संकेत बनभैय्या, देवेंद्र पंढोरे, एकनाथ गंगुले, गोरख वैद्य, गोरख दवंगे, राहुल गायकवाड, रोहन कहार आदी उपस्थित होते.