डोंबिवलीही गुन्हेगारीत आघाडीवर !
डोंबिवली, सरत्या वर्षात गुन्हेगारी वाढल्याचे दिसुन आले असले तरी शहरातील वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्नही केले आहेत. डोंबिवली शहरात चार पोलीस ठाणे असून रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर, आणि मानपाडा आदी पोलिस ठाण्यांचा माध्यमातून कायदा सुव्यवस्था चोख राखण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
डोंबिवली विभागात 18 खून, 12 खुनाचे प्रयत्न, 7 दरोडे, 23 बलात्कार असे गुन्हे दाखल झाले. यातील 11 खुनामध्ये 5 फायरिंग खून झाले आहेत. हे सर्व गुन्हे उघड झाले असून सर्व आरोपींना अटक झाली असल्याची अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रतिबंधक कारवाईंतर्गत जानेवारी ते डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 378 गुन्ह्यांमधून वैयक्तिक हमीपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 जणांना तुरुंगात रवानगी झाली एकाला हद्दपार केले आहे. चाप्टर गुन्ह्यातील एकूण गुन्ह्यांपैकी 2 लाख 35 हजारांचा दंड वसूल केला असल्याचे पोलिसांकडून समजते.
डोंबिवली शहरात सरत्या वर्षांत (2017) दोन फायरिंग घटना झाल्या यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर सासूने जावयाचा खून केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी या सर्व प्रकारात गुन्हे उघड करून आरोपींना शिक्षा झाली असली तरी गुन्हेगारी रोखण्यात पोलीसांना यश कमी आल्याचे वरील आकड्यावरून सिद्ध होत आहे.
कल्याण डोंबिवली महापा लिका नवीन समाविष्ट केलेल्या ग्रामीण भागात गुन्हेगारी प्रमाण जास्त आहे आणि ऑनलाईन फसवणूकीचे प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे येणार्या नवीन वर्षांत डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात गन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे चोर्या, घरफोड्या आणि चेनसँचिंन रोखण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस ठाण्यात सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. वर्षभरात मानपाडा हद्दीत 11 खून, 6 दरोडे, 12 बलात्कार आणि 2 फायरिंग घटना घडल्या आहेत.