Breaking News

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे युवक जोडो अभियान

नाशिक, दि. 12, जानेवारी - जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सुरु असलेल्या युवक जोडो अभियानाचा तिसरा टप्पा दि.12 व 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौर्‍यात युवक जोडो अभियानांतर्गत शाखा उदघाटने, युवकांचे मेळावे व नूतन कार्यकारणीत नव्या चेहर्‍यांना संधी देण्यासाठी चाचपणी करण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे निरीक्षक विशाल काळभोर व युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या उपस्थितीत हा दौरा होणार आहे.

यात शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दिंडोरी, 11.30 वाजता कळवण, 1.30 वाजता देवळा तर सायंकाळी 4.30 वाजता चांदवड येथे शाखा उदघाटने होतील. शनिवार दि.13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सिन्नर, 12 वाजता इगतपुरी, 1.30 वाजता त्र्यंबकेश्‍वर तर 4 वाजता नाशिक तालुक्यातील शाखांची उदघाटने होतील.