श्रीगोंदा तहसील मधील जप्त मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट
याबाबत अधिकची माहिती अशी की , तत्कालीन तहसीलदार अनिल दौंडे व त्यानंतर प्रांत अधिकारी संतोष भोर यांच्या कार्यकाळात भीमा व घोड नदी पात्रात वाळू तस्करांवर कारवाई करून वाळू धुण्यासाठी व सेक्शन बोटी चालविण्यासाठी वापरण्यात येत असलेले डिझेल इंजिन जप्त केले होते. त्याचंबरोबर काही लोखंडी पाईप देखील होते. हे साहित्य पूर्वीच्या जुन्या तहसील इमारतीत ठेवण्यात आले होते. त्यातील काही इंजिन नवीन इमारतीच्या जिन्याखाली ठेवण्यात आले होते. पण मध्यन्तरी जुन्या तहसीलच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी जुन्या तहसील कार्यालयातील भंगार हे अतिशय चिरीमिरीच्या भावात विक्री केली. पण त्यानंतर नवीन इमारतीच्या जिन्याखाली ठेवलेले २ इंजिन हे मात्र आता गायब झाले आहेत.
वास्तविक कोणत्याही शासकीय विभागात जप्त केलेल्या वस्तूचा लिलाव करणे गरजेचे असते. पण याठिकाणी तहसीलदार यांनी स्वतःच्या "समरी "पावर वापरून या सर्व वस्तू आपल्या जवळच्या हितचिंतकांना नाममात्र रुपयात विक्री केल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी कुंपणानेच शेत खाल्ले असा प्रकार झाला आहे. याबाबत श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांचेशी संपर्क साधला असता साहेब एका बैठकीत असल्याचे समजले.
