तंत्रज्ञानाशी सांगड घातल्याने भाषिक पत्रकारिता अधिक प्रगल्भ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या ‘संवाद’ या स्मरणिकेच्या प्रकाशन कार्य्रकमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राज पुरोहित, कृपाशंकर सिंह,डॉ.राजेंद्र प्रताप सिंह व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. खिळे जुळवणीच्या काळापासून तर आतापर्यंतच्या वृत्तपत्र छपाईत अनेक वेगवान बदल झाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक बदल स्वीकारल्याने भाषिक पत्रकारिता आणखी सक्षम झाली व पुढेही ती समृध्द होईल. हिंदी पत्रकारितेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून उज्ज्वल परंपरा असून स्वातंत्र्याच्या लढाईत हिंदी पत्रकारितेचे मोठे योगदान आहे.
