Breaking News

दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करन्याची मागणी


शेवगाव / प्रतिनीधी /- शासनाने भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य रामभाऊ साळवे विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनीधींनी केली आहे.

जि.प. सदस्य साळवे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ,दि. ३ जानेवारीला शेवगावचे तहसिलदार दीपक पाटील यांना मागणीचे निवदेन दिले. निवेदनात म्हंटले आहे की, दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानंवदना करण्यासाठी शांततामय मार्गाने गेलेल्या आंबेडकरवादी अनुनयांवर काही समाजकंटकांनी दगडफेक करून निर्दयपणे हिंसाचार केला. अनेक गाड्यांची तोडफोड केली . या हल्ल्यात एक जणांचा मृत्यू झाला असून शासनाने या घटनेची योग्य ती सखोल चौकशी करून समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. या वेळी प्रजा सुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, लहुजी सेनेचे सुरेश अढागळे, मुकूंद जमधडे, आप्पासाहेब मरकड, सोहेल शेख, बाजीराव जमधडे, प्रकाश दळवी, गौतम दळवी, गौतम साळवे, सुभाष दळवी, आंत्वन साळवे, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.