Breaking News

जिगाव सिंचन घोटाळ्यात 8 जणांवर गुन्हा दाखल-एसीबी

नागपूर, दि. 18, जानेवारी - विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातल्या जिगाव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शपथपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. 

याप्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उपरोक्त 8 आरोपींमध्ये बाजोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक सुमित बाजोरिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंसाधन विभागाचे माजी मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस. आर. सूर्यवंशी, बुलडाणा सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अ भियंता शरद गावंडे, अधीक्षक अभियंता बी. एस. वावरे, अधीक्षक अभियंता भीमाशंकर पुरी व कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांचा समावेश आहे.