मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा
औरंगाबाद, दि. 12, जानेवारी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचे आयोजन 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिक कमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकु मार बडोले आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरी जनतेने लढवीला. प्रचंड संघर्ष आणि अनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले. नामांतर लढ्याचा विजय आणि नामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादन करण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ औरंगाबादमध्ये आयो जित केली जाते. यंदा या अभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याची माहिती या सभेचे संयोजक रिपाइंचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली. रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिले असून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात, गावात नामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्या करण्यात आले आहे.