ठाण्यात ’’वृक्षवल्ली 2018’’ चे भव्य प्रदर्शन
ठाणे, दि. 12, जानेवारी - ठाणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या वतीने वृक्षवल्ली उपक्रमाअंतर्गत ठाण्याच्या मे. रेमंड कंपनी मैदान ,पोखरण रोड नं 1 येथे 12 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत झाडे फुले फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे .
’’वृक्षवल्ली 2018’’ या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा 12 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार 14 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.
या समारंभाला खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, आ. सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
झाडांचे जतन व्हावे,नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी याकरिता वृक्षवल्ली उपक्रमाअंतर्गत गेल्या 10 वर्षापासून ठाणे महापा लिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या वतीने असे प्रदर्शन आयोजित केले जाते .