जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या निःस्पृह न्यायदानाचा प्रत्यय आज धडाकेबाज निर्णयाने दिला. अमळनेर येथे अतिक्रमण हटाव मोहिम थांबवून त्यांना संरक्षण देण्याचा पालिका सभेत ठराव करणार्या नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्यासह 23 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निवाडा आज, मंगळवारी त्यांनी एका प्रकरणात दिला. यामध्ये अमळनेर नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व इतर नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. अमळनेर शहरात पालिका मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी अतिक्रमण हटावची धडक मोहिम सुरू करुन अतिक्रमण करणार्यांना नोटीसा दिल्या होत्या. ही कारवाई रोखण्याचा ठराव पालिका सभेत केला होता. त्याच्या विरोध पदाधिकार्यांनी तातडीने विशेष सभा घेवून अतिक्रमण हटाव कारवाई रोखण्याचा ठराव केला होता. हे प्रकरण जिल्हाधिकार्यांसमोर सुनवाईसाठी आल्यानंतर त्यांनी सर्व तथ्ये तपासून अतिक्रमणास अडथळे आणणार्या पदाधिकार्यांना अपात्र ठरविणार्या कलमाचा वापर करुन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र ठरविणारा निवाडा दिला.
अमळनेर नगराध्यक्षासह 23 नगरसेवक अपात्र
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:59
Rating: 5