Breaking News

महाराष्ट्रातील 15 महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्कार


क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 113 कर्तृत्ववान महिलांना 'फर्स्ट लेडी' हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 महिलांचा समावेश आहे.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने 'फर्स्ट लेडी' हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दि. 20 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दुर्गाबाई कामत व अबन मिस्त्री याना मरणोत्तर 'फर्स्ट लेडी' सन्मान
महाराष्ट्रातील 15 कर्तृत्ववान महिला 'फर्स्ट लेडी' पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.