Breaking News

टॅलेंट ऑफ अहमदनगर कार्यक्रमात युवक-युवतींनी केले आपल्या कला गुणांचे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या विकासात्मक वाटचालीसाठी सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी युवकांनी समाजकार्यात सक्रीय सहभागाचा संकल्प करावा. समाजप्रबोधनासाठी कला हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी केले.


नेहरु युवा केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पडोस युवा सांसद कार्यक्रमांतर्गत माऊली सभागृहात आयोजित टॅलेंट ऑफ अहमदनगर कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी गोडसे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प.सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शितल जगताप, अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड.भानुदास होले, नगरसेविका कलावती शेळके, साहेबान जहागीरदार, पै.नाना डोंगरे, पोपट बनकर, संदिप कुसळकर, अ‍ॅड.पुष्पा जेजुरकर, विनायक अंदे, डॉ.धीरज ससाणे, कार्यक्रमाचे संयोजक सागर आलचेट्टी, मोहसीन सय्यद, संजय मते आदि उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नटराज पुजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युनिव्हर्सलचे अध्यक्ष सागर अलचेट्टी यांनी नवोदित कलाकारांना प्रोत्साह देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. मोहसीन सय्यद यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. जि.प. सदस्या सुवर्णा जगताप यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण चळवळीला व्यापक स्वरुप देण्याकरिता युवकांना तर समाजप्रबोधनासाठी कलाकारांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नगरसेविका शितल जगताप यांनी नवोदित कलाकारांना व्यासपिठ निर्माण करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल फाऊंडेशनने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.