रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाचे संकेत.
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच त्यांच्या राजकारणातील प्रवेशावरील संभ्रम दूर करणार असल्याचे समजते. आपल्या चाहत्यांची भेट घेत राजकारण प्रवेशाविषयी महत्त्वाची घोषणा रजनीकांत यांच्याकडून लवकरच केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रजनीकांत येत्या २६ व ३१ डिसेंबर रोजी चाहत्यांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते राजकारणातील प्रवेशाबद्दल घोषणा करू शकतात, असे ऑल इंडिया रजनीकांत फॅन्स वेल्फेअर क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले.
