Breaking News

पाकिस्तानचा एक घुसखोर.


अमृतसर : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ सीमा सुरक्षा दला(बीएसएफ)ने शुक्रवारी रात्री केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचा एक घुसखोर ठार झाला. नियंत्रण रेषेजवळील अजनाला भागात रात्री साडेदहाच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती अवैध मार्गाने घुसखोरी करत होती. यावेळी बीएसएसच्या ७० क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांनी या व्यक्तीला आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. मात्र, जवानांच्या इशाऱ्याकडे त्याने दुर्लक्ष केले. अखेर जवानांनी केलेल्या गोळीबारात हा घुसखोर ठार झाला