Breaking News

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात सरकार अपयशी

गडचिरोली : भाजप सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्याकरिता कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा अटी व नियमाच्या घोळात अडकली असून ऑनलाइन शासन कर्जमाफीच्या कात्रीत अडकला आहे. 

दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु अजुनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दमडीही जमा झाली नसल्याने भाजप सरकार कर्जमाफीच्या आश्वासनात अपयशी ठरल्याचा आरोप कॉंग्रेस रोजगार सेलचे शहराध्यक्ष बाशिद शेख यांनी केला आहे. .


कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांनी पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यास पंजाबच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाणार, असे आश्वासन राहूल गांधींनी दिले होते. पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता आली व तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाली. 

आता गुजरातच्या निवडणुकीत राहूल गांधी यांनी गुजरातमध्ये सत्ता आल्यास १० दिवसात गुजरातच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू, असे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील एकही शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्याला कॉंग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते तथा प्रदेश उपाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी ५०० रुपये बक्षीस जाहीर केले.