Breaking News

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक ‘विराट’ रेकॉर्ड.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक पराक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलंडणारा विराट हा भारताचा अकरावा खेळाडू बनला आहे. 


विराटने 63 कसोटी सामन्यामध्ये 19 शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने हा टप्पा ओलांडला. भारतातर्फे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात सर्वाधिक 15,921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे. याआधी भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडाप्पा विश्‍वनाथ आणि कपिल देव या फलंदाजांनी पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

‘विराट’ रेकॉर्ड
63 कसोटी सामन्यात 105 डावांमध्ये 5000 धावा. 

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात 63वा कसोटी सामना रंगला होता, त्यात विराटने 31व्या षटकामध्ये 5000 धावांची मजल गाठली. जगातील सर्वात तरुण फलंदाज असणारा विराट हा भारतासाठी 5000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा 11वा खेळाडू ठरला आहे.