Breaking News

मुंबई शहर व उपनगरात दोन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली.

मुंबई शहर व उपनगरात दोन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. बुधवारी १७.३ अंशांची पातळी गाठलेल्या किमान तापमानात गुरुवारी आणखी घसरण झाली व ते १५.८ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. 


सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी असलेले हे तापमान चालू हंगामातील निच्चांकी तापमान ठरले. त्याचबरोबर कमाल तापमानही ४ अंशांनी कमी म्हणजेच २८.२ अंश इतके होते. पुढील दोन-तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

डिसेंबर महिन्यातील मागील दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात थंड दिवस म्हणून २७ डिसेंबर २०११ आणि २४ डिसेंबर २०१५ या दोन दिवसांची नोंद आहे. या दिवशी मुंबईत तापमापकाचा पारा तब्बल ११ अंशांपर्यंत खाली घसरला होता.