Breaking News

आजपासून पोलिसांची ड्युटी आठ तास !

मुंबई : मुंबई शहर पोलीस दलातील सर्व शिपायांना शुक्रवार, १५ डिसेंबरपासून आठ तास ड्युटीची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गुरुवारी दिले. सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व इन्चार्ज यांची तातडीची एक बैठक आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आठ तास ड्युटीची अंमलबजावणी तातडीने शुक्रवारपासून करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले.