Breaking News

पोलीस असल्याची बतावणी करत लुटमारी

श्रीगोंदा/प्रतिनिधी/-कर्जत तालुक्यातील चिचोली काळदाते या ठिकाणचे रहिवाशी राजेंद्र गोरे हे नेहमी प्रमाणे कडबा घेवून श्रीगोंदा मार्गे कडबा विकारीसाठी पुण्याला जात असतात काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडी श्रीगोंदा शहरात आली असता श्रीगोंदा शहरातील अन्वर गुलाब सय्यद( रा इंदिरानगर श्रीगोंदा) या इसमाने कड्ब्याने भरलेला ट्रक श्रीगोंदा बाजार तळाजवळ अडविला आणि तुला जर कायम या रोडने जायचे असेल तर आम्हाला दररोज 5 हजार रुपये द्यावे लागतील. मी पोलीस खात्यात कार्यरत आहे असे म्हणून खंडणी मागितली. मात्र त्याच वेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याची रात्रीची गस्त घालणारी गाडी त्या ठिकाणी आल्यावर सदर प्रकरणाचा उलगडा झाला. अन्वर सय्यद हा पोलीस नसून तोतया पोलीस असल्याचे उघड झाले. गाडीचालक यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत रीतसर फिर्याद दाखल केली पोलिसांनी याबाबत तत्काळ अन्वर सय्यद याला अटक केली त्याचेवर भाद्वी ३८४,३८६,३८७,१७०,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सकाळी श्रीगोंदा न्यायालयात नेले असतात न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.