Breaking News

राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त परिसर स्वछता.


कर्जत/प्रतिनीधी/- एफ.डी.एल. शिक्षण संस्था शेवगाव चे श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालय कर्जत येथील वसतिगृहात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 61 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन स्वच्छतेचे संदेश देत मुलींची प्रभात फेरी काढण्यात आली.
कर्जत शहरातील अक्काबाई नगर येथील मंदीरा समोरील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. या फेरी च्या समारोपाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.पी.आय. चे दत्ता कदम अध्यक्षिय भाषनात म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे व एफ डी एल चे अध्यक्ष अॅड शिवाजीराव काकडे यांनी कर्जत तालुक्यातील गोरगरिबाच्या दीनदलीताच्या मुलीच्या शिक्षणाची कर्जत शहारामध्ये चागंल्या प्रकारची सोय केल्याने तालुक्यातील गोरगरिबाच्या चेहऱ्यावरती आंनद दिसतो. 

वसतिगृहाच्या अधिक्षिका अश्विनी अकोलकर मुलीना मार्गदर्शन बोलताना म्हणाल्या की, मुलीनी आपल्या परिसरातील स्वच्छता आपणच करुन आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वःता घेतली पाहीजे. नाहीतर आपण आजारी पडल्यावर आपल्याला दावाखान्या मध्ये पैसे घालावे लागतात. आपल्या आई वडीलना सुद्धा आपली काळजी घ्यावी लागते.व आपली शाळा बुडते त्यामुंळे आपण कायमच आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहीजे. वसतिगृह अधिक्षिका श्रीमती अश्विनी अकोलकर व संजयराव भैलुमे, अक्षय काकडे, विशाल काकडे आदी उपस्थित होते.