पालकमंत्र्यांच्या हस्ते नाशिक विमानसेवेचा शुभारंभ
नाशिक, दि. 25, डिसेंंबर - जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते नाशिकहून पुणे तसेच मुंबईसाठी विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईहून एअर डेक्कनच्या प हिल्या विमानाने पालकमंत्र्यांसह चौदा प्रवाशांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनातर्फे आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.
पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच प्रवाशांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते पुण्याला जाणर्या प्रवाशांना बोर्डींग पास देण्यात आला. एकूण 13 प्रवाशांनी यावेळी विमानाने प्रवास केला.
नाशिकहून ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेमुळे नाशिक औद्योगिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री महाजन यांनी विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी केले.
ते म्हणाले, विमानसेवेमुळे नशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे प्रवास वेगवान होणार आहे. काही मिनिटात मुंबईला पोहोचणे शक्य असल्याने उद्योजकांना ही सुविधा नाशिककडे आक र्षित करणारी ठरेल. नाशिकच्या व्यापार क्षेत्रालाही याचा लाभ होईल. ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली विमानसेवा नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी सेवा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.