Breaking News

सेक्स रॅकेटचा भंडाफोड, अभिनेत्रींना अटक.

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरात चालणाऱ्या उच्चभ्रू वेश्याव्यवसायाचा भंडाफोड करतानाच मुंबईतील दोन अभिनेत्रींना पोलिसांनी अटक केली आहे. येथील एका पंचतारांकित हॉटेल्समधून या अभिनेत्रींसह इतर काही जणांना अटक केल्याचे पोलीस म्हणाले. 


दोन बुकी हे रॅकेट चालवीत होते. हॉटेलची खोली ऑनलाईन पद्धतीने बुक करीत तेथे ग्राहकांना मुली पुरविण्याचे काम ते करायचे, असे पोलिसांनी सांगितले. या बुकींना तसेच दुसऱ्या एका हॉटेलमधून एका अभिनेत्रीसह दोघांना अटक केल्याचे पोलीस म्हणाले. अटक केलेल्यांकडून ५५ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.