Breaking News

मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज तहकूब !


विरोधी पक्षाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलण्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्षनेत्यांना सांगितले. मात्र, सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री येईपर्यंत कामकाज तहकूब करावे, अशी मागणी केली. 

तर, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी केली. यामुळे मंत्री नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षाच्या वतीने सभागृहात नियम २९३ नुसार दिलेल्या प्रस्तावावर दुपारी चर्चा सुरू करण्यात आली. मात्र, चर्चा सुरू होण्याआधीच विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहात संबंधित मंत्री नसताना विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणे हा चुकीचा पायंडा सभागृहात पाडला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.