Breaking News

'न्यूटन' हा चित्रपट शर्यतीतून बाहेर

राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित 'न्यूटन' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. ऑस्करच्या परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणी पुरस्कारासाठी भारताने आपली अधिकृत प्रवेशिका म्हणून 'न्यूटन' हा चित्रपट पाठवला होता. 


ऑस्करच्या परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत पुढील टप्प्यासाठी एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'न्यूटन'चा समावेश नाही. नक्षलग्रस्त छत्तीसगडच्या जंगलांमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावर नियुक्ती झालेल्या प्रामाणिक निवडणूक अधिकाऱ्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 

राजकुमार रावने या चित्रपटात निवडणूक अधिकाऱ्याचे पात्र साकारले आहे. ऑस्कर पुरस्कारासाठीच्या पुढील नामांकनांची घोषणा येत्या २३ जानेवारीला केली जाणार आहे. येत्या ४ मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या रंगारंग सोहळ्यादरम्यानऑस्कर पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे.