Breaking News

दुचाकी घसरून तरूण जखमी.

जळगाव : धावत्या दुचाकीवर प्रकृती अत्यवस्थ झाल्याने गाडीचा अर्जन्ट ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता तरूण खाली पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी चिंचोली फाटयाजवळ घडली होती. 


रमजान नवाब तडवी (३५) कासारखेडे (यावल) असे जखमीचे नाव असून त्यास अधिकच्या उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासारखेडे येथे यात्रा होती. मेहुणे येणार असल्याने सायंकाळी रमजान हे त्यांना घेण्यासाठी चिंचोली फाटयावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. गाडी चालवित असताना चक्कर आल्याने त्यांनी अर्जंट ब्रेक लावल, परंतु ते पडल्याने डोक्यास मार लागून ते जखमी झाले.