Breaking News

दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणात फाशीची शिक्षा.

केरळात एका दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणात दोषी आरोपी मोहम्मद अमीरूल इस्लामला स्थानिक न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. 


प्रस्तुत बलात्काराची घटना बहुचर्चित दुर्मिळ निर्भया हत्याकांडासारखीच असल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदविले आहे. केरळच्या पेरूम्बुवूर येथे विधी शाखेत शिकणाऱ्या ३० वर्षीय दलित विद्यार्थिनीची बलात्कारानंतर हत्या करण्याचे क्रूर व अमानवीय कृत्य केले होते. 

दिल्लीतील निर्भया हत्याकांडासारखाच हा प्रकार असल्याचे नमूद करीत न्यायमूर्तींनी अमीरूलला फाशीची शिक्षा सुनावली आहे. भादंविच्या कलम ३७६(अ) नुसार तो दोषी आढळला आहे. सदरची घटना ही दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या क्रूर निर्भया कांडासारखीच अतिशय दुर्मिळ असल्याचे मत न्यायाधीश एन. अनिल कुमार यांनी व्यक्त केले.