Breaking News

शिंदे कारखान्यासमोर शेट्टींच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा

सोलापूर - तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक 400 रुपये ऊसदर द्यावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण केले. संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 


तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना निवेदन देण्यात आले. चारही कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना तातडीने याप्रश्‍नी तोडगा काढण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार पडदुणे यांनी सांगितले. सकाळी अकराला सुरू झालेले आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले. या आंदोलनास भूमाता शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला.