Breaking News

मराठी चित्रपटांना चित्रपटगृह नाकारणा-यांवर कारवाई का नाही ?- नाना पाटेकर

मुंबई, दि. 21, डिसेंबर - मराठी चित्रपटांना चित्रपटगृह नाकारणा-यांवर सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्‍न अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारला. देवा आणि गच्ची या मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याने सध्या वाद सुरु आहे.



महाराष्ट्र सरकारने चित्रपटगृहांना मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगचा आदेश दिला असूनही काही चित्रपटगृहांचे मालक आदेशाचे पालन करत नाहीत. त्यामुळे आदेश असतानाही थिएटर मालक उल्लंघन का करत आहे ? आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर सरकार कारवाई का करत नाही ? असे नानांनी विचारले आहे. येत्या शुक्रवारी सलमान खान,कतरिनाचा ’टायगर जिंदा है’ आणि अंकुश चौधरीचा ’देवा’ आणि ’गच्ची’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण ’देवा’ आणि ’गच्ची’ या दोन्ही चित्रपटांना सिनेमागृह मिळत नसल्याचे समोर आले आहे