Breaking News

अपहृत भारतीयांचे डीएनए नमुने इराकला पाठवले.

नवी दिल्ली : इराकच्या मोसूल शहरातून जून २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीय मजुरांचा तपास करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांच्या 'डीएनए'चे नमुने एकत्र करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते इराक प्रशासनाला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिली. 


खासदार अश्विन कुमार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मोसूलमधून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या नागरिकांच्या शोधासाठी केंद्र सरकारने इराक व इतर देशांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. इराकने गत जुलै व ऑगस्ट महिन्यात इसिसच्या जोखडातून मोसूल व बादुशचा भाग मुक्त केल्यानंतर या भागात दफन केलेले अनेक मृतदेह आढळले होते. यानंतर इराक अधिकाऱ्यांनी भारतीय प्रशासनाकडे बेपत्ता नागरिकांच्या नातेवाइकांच्या 'डीएनए' ची मागणी केली होती. .