Breaking News

६५ टक्के रेल्वे आरक्षण ऑनलाइन.


नवी दिल्ली : रेल्वे प्रवासाच्या आरक्षणापैकी ६५ टक्के बुकिंग आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन करण्यात येते, अशी माहिती बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. लोकसभेत खासदार सुखबीर सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रेल्वे प्रवासी ऑनलाइन तिकीट बुक करत असल्याने आरक्षण केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. सद्यस्थितीत देशातील ३ हजार ४४२ रेल्वे स्थानकांवर १३७ प्रवासी आरक्षण केंद्रे आहेत.