Breaking News

बलात्कारपीडित मुलगी उच्च न्यायालयात

मुंबई : बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. वैद्यकीय कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणांत गर्भपाताची परवानगी दिली असल्याने आपल्या मुलीच्या प्रकृतीच्या कारणास्तव गर्भपाताला परवानगी द्या, अशी विनवणी केली आहे.

 

त्याची दखल न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने घेतली आहे. तसेच जे. जे. रुग्णालयामध्ये वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करून ४ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी ५ डिसेंबरला निश्चित केली आहे..