Breaking News

शिर्डीत शासकीय परवानगीने खासगी यंत्रणेमार्फत सर्वे हद्दवाढी संदर्भात प्रस्ताव नाही.


शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डी नगरपंचायत हद्दीतील श्रीसाईबाबा मंदिर शिर्डी हे ‘अ’वर्ग धर्मस्थळ आहे. साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून दररोज हजारो साईभक्त शिर्डीत साईसमाधीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आय. टी. विभागाकडून शिर्डी शहर सुरक्षित आणि आधुनिक शिर्डी शहर संकल्पना साकारण्यासाठी नगरपंचायत अंतर्गत सॉफ्टेक इंडिया प्रा. लि. या कंपनीमार्फत सदर कंपनीने जिल्हा पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन सर्वे सुरु केला असल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्वे शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टिकॊणातून दृष्ठीकोनातून असावा, असा कयास लावला जात आहे. त्यामुळे शिर्डीसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून या सर्वेची मोठी उत्कंठावर्धक चर्चा ऐकायला मिळत आहे.
या कंपनीच्या पथकाने शिर्डीलगतच्या निमगाव हद्दीत आधुनिक मशिनरींसह ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हा सर्वे केला. दरम्यान, यासंदर्भात निमगावचे उपसरपंच विजय कातोरे यांनी याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना हा सर्वे कसला आहे, शासकीय परवानगी आहे का, असे विचारले

असता सुरुवातीला माहिती देण्यास प्रतिनिधींनी नकार दिला. मात्र त्यानंतर निमगावमध्ये शिर्डी पोलिसांना बोलविण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता शिर्डी शहराची हद्द वाढविण्यासाठी या कंपनीला सर्वे करण्याची जबाबदारी दिली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगीचे पत्रदेखील त्यांनी यावेळी दाखविले. यावरून ‘सुरक्षित’ आणि ‘आधुनिक’ शिर्डी करण्याबाबत शासनस्तरावर जोरदार

हालचाली सुरु असल्याचे स्पष्ट होते. शिर्डी शहराचा परिसर लहान असल्याने शहराची हद्दवाढ करण्याबाबत हालचाली प्रशासकीय स्तरावर चालू आहेत. त्याअंतर्गत सरकारने या एजन्सीवर ही जबाबदारी सोपविली आहे. शिर्डी शहरालगत निमगाव, रुई, पिंपळवाडी, कणकुरी, नांदुर्खी, सावळीविहीर, राहाता व साकुरी ही गावे येत आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपनीने सर्वे सुरु केला होता. शासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली हे काम करून घेतले जात असले तरी त्यासाठी त्या

ग्रामपंचायतीचे रीतसर परवानगी घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच विजय कातोरे यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हद्द माहिती नसल्याने आमचे काम सुरु होते. आता त्याबाबत कार्यालयाशी बोलून करवाई केली जाईल, अशी लेखी या कंपनीच्यावतीने अधिकाऱ्यांनी कातोरे यांना दिली.

नगराध्यक्षांचा नकार ; जिल्हाप्रशानाचा होकार

यासंदर्भात नगराध्यक्षा योगिता शेळके व नगरसेवक अभय शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की शिर्डी नगरपंचायतीने हद्दवाढीबाबत कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही. या प्रकाराबाबत नगरपंचायतीचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कंपनीकडे असलेल्या पत्रात मुख्याधिकारी, शिर्डी नगरपंचायत {पत्र क्र. न. प. २५९१/२०१७ दि.७/१०/२०१७} जिल्हा पोलीस

अधीक्षक नाहरकत पत्र {क्र. ६६७१/२०१७ दि.०६/१०/२०१७ } च्या परवानगीबाबत पत्राचा उल्लेख सादर कागदपत्रात करण्यात आला होता. तर जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या सहीच्या {पत्र क्र. २९५८ दि. ११/१०/२०१७ } या लेखी व संदर्भपत्राचा उल्लेख पत्रात दिसून आला. मात्र सर्वे नेमका कशाचा, हीच चर्चा गेल्या दोन दिवसापासून शिर्डी परिसरात सुरु आहे. या