राहुरीमध्ये घरफोडी,रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास
चोरटयांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास साठे यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे डोरले, अंगठी , पैंजण, आदींसह रोख रक्कम असा ४१ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत भारती साठे यांनी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपास स. फौ. अनिल गायकवाड यांनी केले.
