Breaking News

दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

 टीम इंडिया नवीन वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाली असून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा या दौऱ्यात ३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.


भारताचा एकदिवसीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.