दखल भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय?
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वागणुकीतून, बोलण्यातून आपल्याच पक्षाची अडचण वाढवू नये, ही साधारण अपेक्षा असते; परंतु सुसंस्कृततेचा आव आणणारे नेतेच आपल्या वाचाळपणतून पक्ष, सरकारची कशी अडचण करतात, हे गेल्या साडेतीन वर्षांत वारंवार अनुभवायला मिळालं आहे. भाजपत एक शाऊटिंग ब्रिगेड आहे. ती विरोधकांऐवजी स्वकीयांचीच अडचण करीत आहे. गेल्या चार महिन्यांपासून देशातील आर्थिक स्थितीवर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखी मंडळी तुटून पडत होती. गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर तरी त्यांचा पित्तागकी शांत होईल, अशी अपेक्षा होती; परंतु अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्पाची तयारी करीत असताना आर्थिक स्थितीबाबत वादग्रस्त वक्तव्यं करून हे नेते भाजपचीच कोंडी करीत आहेत.
त्यात स्वामी हे तर अतिशय वादग्रस्त नेते. त्यांना सांभाळणं म्हणजे किती संकटं ओढवून घ्यावी लागतात, हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच कळलं असेल. या स्वामींचं एक बरं आहे, सोनिया गांधी यांच्याविरोधात जितकी कठोर टीका करायची, त्यांच्याविरोधात जेवढा तीव्र लढा द्यायचा, तेवढ्याच ताकदीनं ते मोदी व जेटली यांच्याविरोधातही तुटून पडतात. नोटाबंदी, जीएसटीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, उलट गुजराती जनतेनं नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे, असं मोदी व जेटली घसा फुटेपर्यंत ओरडून सांगत आहेत. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर कसा वाढत आहे, हे निदर्शनास आणून ते विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न करीत असताना स्वामी यांनी मात्र भाजपचं पितळं उघडं पाडताना अनेक गंभीर आरोप केल्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलित दिलं आहे.
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पक्षाविरोधात वक्तव्य करून अडचणीत वाढ केली आहे. स्वामी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि देशांतर्गत एकूण उत्पन्नावर (जीडीपी) प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचं दाखवण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या अधिकार्यांवर सातत्यानं चांगले आकडे देण्यासाठी दबाव आणतं, असा आरोपच त्यांनी केला आहे. सर्व आकडेवारी बनावट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. स्वामी यांच्या या वक्तव्यामुळं मोदी सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात. अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाऊंटंटच्या एका परिषदेत बोलताना त्यांनी स्वपक्षालाच लक्ष्य केलं. केंद्र सरकारनं दिलेल्या तिमाही आकडेवारीवर जाऊ नका. ते सर्व बनावट आकडे आहेत. माझ्या वडिलांनीच सांख्यिकी विभागाची स्थापना केली होती, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे, असं सांगायला ते विसरले नाहीत. नोटाबंदीमुळं अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम पडला नाही, अशी आकडेवारी देण्याचा या विभागावर दबाव आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला आहे, असं सांगताना त्यांनी सांख्यिकी विभागाच्या अधिकार्याचा हवाला दिला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आकडेवारीचा अंदाज कसा काढला, असा प्रश्न मी सांख्यिकी विभागाच्या संचालकांना विचारला, तेव्हा त्यांनी आम्ही दबावात होतो, सरकारने आकडे मागितले आम्ही दिले, असं सांगितलं.
तिमाही आकड्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांनी केलं. देशाचा विकास दर 5.7 टक्के होता. तसंच नोटाबंदी व जीएसटीच्या परिणामामुळं देशातील उद्योगधंदे अडचणीत आले होते. या मुद्यांवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भर दिला होता. त्यांच्या आरोपामुळं भाजप अडचणीत आला असताना देशाच्या विकासदराची आकडेवारी सांख्यिकी विभागानं दिली. त्याचा आधार मोदी यांनी गुजरातच्या प्रचारात घेतला. ही आकडेवारीच बोगस असल्याचं आता स्वामी सांगत आहेत. निवडणुकीच्या काळात मूडीज नावाच्या संस्थेचा अहवाल आला. त्या अहवालात भारताचा पतमानांकन दर्जा वाढविण्यात आला होता. त्याचंही भांडवल मोदी व जेटली यांनी केलं होतं. विशेष म्हणजे याच मोदी यांनी अमेरिकन पतमापन संस्थांच्या विश्वासार्हतेविषयी शंका घेतली होती. जेटली यांचा सूरही तोच होता; परंतु आता स्वामी यांनीच मूडीजच्या अहवालाबाबत साशंकता व्यक्त केल्यानं भाजपची अडचण झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यात सुरू होत असताना स्वामी यांच्या वक्तव्यानं भाजपपुढं पेच निर्माण झाला आहे.
विरोधक या गोष्टीचं भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथित गोरक्षकांवरून भाजपला कायम बचावात्मक भूमिकेत जावं लागतं. मुस्लीम व दलित समाज विरोधात गेला, तर काय हा भाजपपुढचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये तसा संकेत मिळाला आहे. स्वयंघोषित गोरक्षकांची बेताल विधानं आणि अतिउत्साही कृतीमुळं आतापर्यंत भाजप अनेकदा अडचणीत आला आहे. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. राजस्थानमधील भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी एक वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गायींची तस्करी आणि हत्या करणार्यांना लोकांचा मार खाऊन जीव गमवावा लागेल, असं त्यांनी म्हटलं. अलवार जिल्ह्यात गायींची तस्करी करणार्या एका व्यक्तीला पकडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
या व्यक्तीचं नाव झाकीर असून तो ट्रकमधून अवैधपणे गायींना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप आहे. अलवरच्या खिलोरा गावाजवळ स्थानिकांनी झाकीरचा ट्रक पकडला. त्यामध्ये आठ गुरं होती. झाकीर गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावानं त्याला बेदम मारहाणही केली. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याला स्थानिकांच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात दाखल केलं. या पार्श्वभूमीवर बोलताना ज्ञानदेव अहुजा यांनी म्हटलं, की गायींची तस्करी आणि हत्या करणार्यांना अशाचप्रकारे जमावाचा मार खाऊन मरावं लागेल. यापूवीर्ही ज्ञानदेव अहुजा यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. दिल्लीच्या जेएनयूतील आंदोलनानंतर त्यांनी म्हटलं होतं, की जेएनयूच्या परिसरात रोज 3 हजार वापरलेले कंडोम, 2 हजार दारुच्या रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी 500 इंजेक्शन, 50 हजार हाडांचे तुकडे आणि 10 हजार सिगारेटचे तुकडे मिळतात. याशिवाय, जेएनयूचे विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नग्न नृत्य करीत असतात, असाही आरोप त्यांनी केला होता. त्या वेळी आहुजा हे राजस्थानमधील आपला मतदारसंघ सोडून वापरलेले कंडोम मोजण्यासाठी जेनयूत ठाण मांडून बसतात का, असा सवाल करण्यात आला होता. अशा वादग्रस्त नेत्यांमुळं भाजपची पंचाईत होते.