Breaking News

सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास ’चक्का जाम’

सांगली, दि. 22, डिसेंबर - सांगली महापालिका क्षेत्रात राज्य शासन निधीतून मंजूर 33 कोटी रूपयांची 147 रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. अन्यथा, ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेतील नगरसेवक शेखर माने यांनी आज दिला.शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील उपमहापौर गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.


या रस्त्यांची ही सर्व कामे येत्या दहा दिवसात तातडीने सुरू करण्याची ग्वाही डी. एस. जाधव यांनी दिली. महापालिका क्षेत्रातील सांगली व कुपवाड शहरासह विस्तारीत भागात 33 कोटी रूपये खर्चाची 147 रस्त्यांची कामे राज्य शासन निधीतून मंजूर झाली आहेत. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाकडून ना हरकत दाखले आहेत. त्यानंतर या कामासाठी निधी वर्ग होऊन निविदा प्रक्रियाही झाली. या रस्ते कामाचे कार्यआरंभ पत्रही एक महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदारांना देण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही या रस्ते कामाला मुहूर्त सापडलेला नाही.