पालघर पोलिसांनी बलात्का-यास केले अटक
पालघर, दि. 29, डिसेंबर - पूर्वेकडील वेवुर येथे राहणा-या एका 17 अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी वसीम अमीर शेख (23) यास पालघर पोलिसांनी पोस्को कायद्याखाली अटक केली आहे. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे का? याचा पालघर पोलीस तपास करीत आहेत.
वेवुर येथे राहणार्या अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहणार्या आरोपीने 16 ऑगस्ट रोजी या मुलीला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले. दादरवरून उत्तर प्रदेशात जाणारी गाडी पकडून ते दोघे मिर्झापूर येथील मित्राच्या घरी उतरले व तेथे त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. 23 सप्टेंबरला मिर्झापूरवरून ते दोघेही चंदीगडला आले. तेथे भाड्याने खोली घेऊन तो एका प्रेसमध्ये नोकरी करू लागला. आपण कोठे राहतो ह्या बाबत कुणालाही काही माहिती दिल्यास चांगले होणार नाही असा दम त्याने तिला दिला.
तेथून 11 ऑक्टोबरला त्या दोघांनी थेट डहाणू गाठले आणि त्या शेखचा छोटा भावोजी समीम शेख यांनी दोघांचा निकाह लावून दिला. तेथे त्यांनी 22 दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी सुरत गाठले. आणि काही दिवसातच त्या मुलीला मारहाण होऊ लागली. त्यामुळे वसीम शेखचा खरा चेहरा तिच्या समोर आला. मारहाणीच्या प्रकारात वाढ होऊ लागल्यानंतर सुरतला ज्या भाड्याच्या खोलीत ते राहत होते. त्या मालकीणीला विनंती करून त्यांच्या मोबाईलवरून तिने आपल्या आईशी संपर्क साधला. त्यांनी पालघर पोलिसांच्या मदतीने सरळ सुरत गाठले आणि दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी वसीम विरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.