नगर ता. प्रतिनिधी: तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच अर्चना चौधरी यांनी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्याकडे सरपंचपदाचा राजीनामा दिला. सभापती भोर यांनी तो मंजूर करत संबंधित कार्यालयाकडे पाठवला आहे. ग्रामपंचायतीला १४ वा वित्त आयोगाचा निधी हा मोठ्या प्रमाणात आला आहे. या निधीची विल्हेवाट लावताना गावच्या विकासाच्या दृष्टीने कामे न करता या निधीचा वापर हा ग्रामपंचायतीने पूर्वीच्याच कामांवर केला आहे, ही बाब भाजपा किसान मोर्चाचे नगर तालुकाध्यक्ष बबन शेळके यांच्या निदर्शनास आली. शेळके यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. चौदाव्य वित्त आयोगाच्या कामाची चौकशी करून झालेल्या कामात गैरकारभार आढळून आल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी शेळके यांनी निवेदन दिले होते. या निवेदनावरूनच जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी संबंधित विभागास कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यांनतर काही दिवसानंतर चिचोंडी पाटीलच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने गावामध्ये चर्चेचे वातावरण बनले आहे. येथील रहिवासी गणेश इंगळे यांनीही चौदाव्या आयोगाची चौकशी व्हावी, यासाठी अधिकार्यांकडे पाठपुरवठा केल्याने या कामाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचा अनेक गावांमध्ये बोजवारा उडाला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत दखल घेउन झालेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यत पोहचवावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. चिचोंडी पाटील येथील सरपंचांनी त्यांचा राजीनामा सभापती आणि उपसरपंचांच्या समक्ष मंजूर केला.
चौदाव्या वित्त आयोगाच्या कामांप्रकरणी दोषींवर कारवाई करा : शेळके
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:43
Rating: 5